वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अमुचा देश सुखाची खाण

(चाल : हमारा प्यारा हिंदुस्थान...)
 
अमुचा देश सुखाची खाण ।
यासी यश देवो भगवान धृ.
 
धनधान्याने हो भरपुर हा । गोवंशाने हो सुंदर हा ।
वाढो शेति शक्ति खदान  यासी यश... ॥१
 
वीर तरुण हो सर्व शिपायी । तत्पर देशासाठि सदाही 
रक्षो राष्ट्रपित्याचे दान  यासी यश... ॥२
 
राष्ट्रध्वज हा प्रीय तिरंगा । अखंड राही जैसी गंगा ।
वाढो सत्य-अहिंसा मान  यासी यश... ॥३
 
हिंदराष्ट्र हे अखंड नांदो । अखिल विश्वही यासचि वंदो 
सगळ्या धर्माचा जिवप्राण  यासी यश... ॥४
 
जातीभेद मिटो हा सारा । मानवतेने हो अति प्यारा ।
तुकड्यादास करी गुणगान  यासी यश... ॥५