वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अमुचा सर्वांचा तूच हरी

(चाल : में एक छोटासा बच्चा हूँ...)

अमुचा सर्वांचा तूच हरी ।
अन्य कुणाचे ध्यान, करावे सांग तरी ? ॥धृ.॥

सर्व घटी अणि सर्व मठी तू, व्यापक पंढरिराणा ।
असे असुनिया भक्तासाठी घे अवतार सगुणा !
अनुभव सगळ्यांना हा येतो, मग कोणाचे पाय,
धरावे सांग तरी ॥१॥

जेथे भक्त तुझे सत्कार्यी रमती जिव लावूनी ।
तेथे तू प्रगटलास म्हणती मायारुप दावूनी ॥
जैसे प्रल्हादा रुप दावी, का इतरांचे नाम,
भजावे सांग तरी ? ॥२॥

अमुचे सुख-दुख तुझ्याच पायी, सांगुनि मन रमवावे ।
तुकड्यादास म्हणे जगदीशा ! व्रत ऐसे टिकवावे ॥
नाही का म्हणशी ? कोणाला-अंतकाळि गुरुमाय,
म्हणावे सांग तरी ? ॥३॥