वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अद्वैतरुप ज्याचे, ते स्वामी

(चाल : सबके लिये खुला है...)
 
अद्वैतरुप ज्याचे, ते स्वामी जाण साचे ।
अपरोक्ष ज्ञान ज्याला, ते भाग्य साधकाचे धृ.॥
 
सोडूनि सुख-दुःख, स्त्री-मायबाप देख ।
होई त्वरे सेवक, वद नाव त्या गुरुचे ॥१॥
 
श्रेष्ठ नाहि रे ! आणिक, घेइ घेइ सत्य भाक ।
बोले पार्वती - नायक स्मर रात्रं - दिन वाचे ॥२
 
चांगदेव योगि मोठा, करि घेइ शेष- सोटा ।
ज्ञानेश सांगे वाटा, हे वचन रे ! ग्रंथाचे ॥३॥
 
सदगुरुच वेद जाणी, रमवाच नामि वाणी ।
लोकी मरा करोनी, ऋषि वाल्मिकीहि नाचे ॥४
 
सानथोर मानि सम, वाचे दिसेल प्रेम ।
करि कर्म ते निष्काम, रुप ज्ञानमय जयाचे ॥५॥
 
सांडोनी आशा तृष्णा, पाषाणा फोडि पान्हा ।
नाचे द्वारकेचा कान्हा, अगणीत भक्त त्याचे ॥६॥
 
नाव आडकोजी गुरु, सत्य साधकासि तारु ।
स्मरता करीत पारु, तुकड्या स्वरुपि नाचे ॥७॥