वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अंबिके ! तारक सकलांची

(चाल : आरती जय जगदीश्वर की...)

अंबिके ! तारक सकलांची ।
आदिजननी तू जगताची ॥धृ०॥

शक्ति तू मूळ अनादीची । स्फूर्ति तू निज चैतन्याची ॥
रुपसुंदर लावण्याची । चित्कळा चराचरी साची 
स्थान तव रम्य अती शोभे ।
अमरपदि प्रशांत सुख लाभे ।
मन हे मोहुनि पदि झोंबे ।
तुझा दरबार सुखाचा सार म्हणो अवतार
खचित तू स्फूर्तिदायि अमुची ।
गमसि मूळ वाचा वैखरिची ॥१॥

कितिक सांगती तुझी ख्याती । नाहि त्या साक्षीची गणती 
पावसी तू पुढता पुढती । कुलस्वामिनी तुला म्हणती 
नवविधा भक्ती नवरात्री ।
आदरे यथामती पुजती ॥
कुठे तू महिषासूर-मथनी ।
कुठे तू योगेश्वरि म्हणुनी ।
इथे तू एकविरा जननी ।
भक्त सुखदायि वत्सले आई ! नमू तव पायि
होई रथ-वाहक तुकड्याची ।
भक्ति मज दे श्रीसदगुरुची ॥२॥