वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

दयेच्या सागरा रामा !

(चाल : अगर है शौक मिलने का...)

दयेच्या सागरा रामा ! असा का कोपला आजी ?
कुठे पाहू तुला नयनी ? राखजो लाज ही माझी ॥धृ.॥

कुणी वल्कलही नेसोनी, कुणी रानात बैसोनी ।
पाहती ध्यान लावोनी, तया करिसी दगाबाजी ॥१॥

कुणी अन्नास सोडोनी, कुणी विषयास मोडोनी ।
भटकती नग्न होवोनी, न भुलसी त्याचिये साजी ॥२॥

कुणी फल पुष्प वाहोनी, कुणी योगाचिये ध्यानी ।
बरळती बोलके ज्ञानी, तू घेसी हाक प्रेमाची ॥३॥

म्हणे तुकड्या कुठे गेला, जयाचा तो तिथे नेला ।
सुशोभे सद्गुरुवाला, व्यसन हे आड ये ना जी ! ॥४॥