(चाल : अगर है शौक मिलने का...)
प्रभू ! मायेचिया आशे, भटकलो तारि गा आता ।
सख्या स्वामी दीनालागी, हो पावन ठेवितो माथा ॥धृ.॥
उठे वृत्ती मनी इच्छा, अशाश्वत साधण्यासाठी ।
नको दावू अता माया, श्रमी बहु जाहलो त्राता ! ॥१॥
बहू फिरलो जनम मरणी, न ये तुमची मला स्मरणी ।
कि देई ठाव मग धरणी, कृपा कर राधिका - कांता ॥२॥
पिसा बनलो मी विषयांधे, बहुगुणी पाच ते नांदे ।
म्हणे तुकड्या हरी ! वंदे, तूंच आता पिता-माता ॥३॥