वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

करा काही कृपा आता

(चाल : अगर है शौक मिलने का...)

करा काही कृपा आता, किती पाहता मती माझी ?
पुरेना मी कसवटीला, कळेना का तुम्हाला जी ! ॥धृ.॥

मनाची धाव ही थोडी, पुरेना ध्यान करण्याला ।
भरारी घेत विषयाची, सदा देई दगाबाजी ॥१॥

मिळेना संगती कोठे, कुणीतरी बोध करण्याला ।
लुबाडे - संत हे फिरती, जया द्रव्याचि ये हाजी ॥२॥

भला संसार- ओढा हा, मिळेना भीक भक्तीला ।
दान हे स्वार्थि - लोकांचे, करी बुध्दि सदा पाजी ॥३॥

उणे जरि कर्म हे माझे, भरा तरि सहज लीलेने ।
फजीती ही पुरी वाटे, बना तुकड्याचिये गर्जी ॥४॥