वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

रम बा ! रम सखया !

(चाल : बाळा जो जो रे...)

रम बा ! रम सखया ! गुरुराया !
शुध्द करी मम काया ॥ रम बा ! ॥धृ.॥

तू रमलास जरी, या देही ।
भीति न मग मज काही ।
स्वसुखे राहिन मी, उत्साही ।
निर्भय या भव-डोही ॥ रम बा ! ॥१॥

मग मज काय उणे, त्रैलोकी ?
फिरलो जरि निःशंकी ।
नुरली आसक्ती, या लोकी ।
या लोकी, परलोकी ॥ रम बा ! ॥२॥

गड हे विषयांचे, बळ घेती ।
जिंकुनिया मज जाती ।
न सुचे काहि मना, ने हाती ।
जाऊ न दे यम-पंथी ॥ रम बा ! ॥३॥

जप-तप जरी केले, योगांगे ।
तल्लिन मन ना रंगे ।
करि धर - सोड सदा, मधि भंगे ।
रंगू दे चिद्रंगे ॥ रम बा ! ॥४॥

तीर्थानि गेलो, बघण्याला ।
जीव न तिळभर धाला ।
वाटे शोक मना, धिर खचला ।
शांति न आलि मनाला ॥ रम बा ! ॥५॥

तुकड्यादास म्हणे, घे करुणा ।
दे धरणा मज चरणा ।
न उणा ठेव मना, दूरपणा ।
जाळी तम अज्ञाना ॥ रम बा ! ॥६॥