(चाल : जमुनातट राम खेले...)
कोण करी भवपार अनाथा ?
कोण करी ? ॥धृ.॥
तारक तूचि मनी समजोनी,
दीनपणे जोडित मी पाणी ।
ठेवित तव चरणावरि माथा ॥१॥
भवसागर हा दुस्तर भारी ।
जाइन कैसा तुजविण पारी ?
त्राता तूचि अम्हाला आता ॥२॥
माया-बंधन दूर सुटेना,
कर्मठ हा धन-बंध तुटेना ।
फसला जीव प्रपंची नाथा ! ॥३॥
तारक तू सकलांचा रामा !
कर करुणा, करुणा-घनश्यामा ।
तुकड्यादासा घे निज हाता ॥४॥