वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

लागो प्रभु ! तव छंद मनाला

(चाल : जमुनातट राम खेले...)

लागो प्रभु ! तव छंद मनाला, लागो प्रभु ! ॥धृ.

अघोर हा भव-पाश- तमाशा,
स्वप्नासम फसवी मम आशा ।
सौख्य नसे मन वांछि तयाला 

सुख- शोधार्था व्यर्थ भटकलो,
सुख नाही पण दुःखि लटकलो ।
फास गळा यमकुंड मिळाला 

गुरु- पदसेवा नाठव झाली,
विषय - श्रृंखला येउनि पडली ।
प्राण तुझ्याविण विपरित गमला 

आठवती नाठवती झाली,
नाठवती येउनिया पडली ।
संगतिने निज जीवहि फसला 

श्रीगुरु आडकुजी सुख-सखया !
ब्रीद तुझे जाइल की वाया ।
तुकड्यादास पदांबुज धाला