वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

धाव तोड भव-बंधा

(चाल : जमुनातट राम खेले...)

धाव तोड भव-बंधा, ये प्रभु ! धाव ॥धृ.॥

कृपण कसा अंतरि बनलासी,
की तुज नाही मम अभिलाषी ?
फसला जीव सदैव मुकुंदा ! १॥

एकिकडे षड्रिपुचा मेळा,
एकिकडे कर्माच्या ज्वाळा ।
जुडवाया देती मज फंदा ॥२॥

काय करु न सुचे मज काही,
आश्रय कोण तुझ्याविण देई ?
भुललो या विषयाच्या नादी ३॥

दुर्दैवाच्या ओझे पळसी,
सुदैव पाहूनी सुंदर वळसी ।
तुकड्यादास धरी तव छंदा ॥४॥