वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

हे दीनदयाळा, रामा !

(चाल : हे राष्ट्ररूपिणी गंगे...)

हे दीनदयाळा, रामा !
कामा आला बहुतांच्या तूं धृ.॥

शीळा पाहुनी अहिल्या, देसि चरण रज-प्रेमा ।
जागृत करुनी देह तियेचा, नेसि स्वये निज धामा १॥

ऋषीश्वरांचे रक्षण करण्या, वधसी असुर सुकामा ।
स्थळोस्थळी, आश्रमी जाउनी, उध्दरिले घनश्यामा ! ॥२॥

कोळी वाल्मिक पश्चात्तापे, जपता उलट्या नामा ।
शब्दभेद नच काही जाणुनि, देसि तया विश्रामा ॥३॥

तव महिमार्णव गाति पुराणे, नेति म्हणुनि अभिरामा !
तुकड्यादास लीन तव चरणी, धरुनि हृदयि तव नामा ॥४॥