(चाल : जमुनातट राम खेले...)
देइ मना सद्गुरु ! पद-सेवा ।
देइ मना ॥धृ.॥
नच सांभाळे काळ-उसांडा,
नलगे मज सुख-संपद-रांडा ।
मानिन मी तुज ईश्वर - भावा ॥१॥
वृत्ति सदा निःसंग असू दे,
मूळ- रुपांतरि स्वस्थ बसू दे ।
चुकवी मम काळाच्या खेवा ॥२॥
सुखकर साधू-संग असावा,
शाल-दुशाला काही नसावा ।
ऐक्य वसो निज दैव सुदैवा ॥३॥
जोवरि वास इथेच घडावा,
निकटपणा तो मानसि द्यावा ।
तुकड्यादास म्हणे गुरुदेवा ! ॥४॥