(चाल : पांडवा सम्राट पदाला...)
सावळ्या ! ये, निर्मला रे !
का असा अजि कोपला ? ॥धृ.॥
भक्त-महिमा वाढवाया, धावशी का रामराया ?
दीन हा घे आजि पाया, का कुठे तू झोपला ? ॥१॥
द्रौपदीच्या संकटासी, लवकरी धावोनी येसी ।
जनीचे दळणे दळीसी, मजविशी का लोपला? ॥२॥
ध्रुवबाळा रुप दावी, चोखियाची ढोरे नेई ।
दास तुकड्या आस वाही, दर्शनी या सोपला ॥३॥