वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

भक्तांच्या हृदयवासा !

(चाल : वनवासी राम माझा...)

भक्तांच्या हृदयवासा !
रामा ! भेटि दे अता धृ.॥
 
दंभ-मोह-ममता सारी, दावि भीति चित्ता १॥
 
गर्भवास-दुःखे भारी, नको दावु नाथा ! ॥२

शांतविण्या तुकड्यादासा, प्रेम दे अनंता ! ॥३