वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

सृष्टीच्या सृष्टिकर्त्या !

(चाल : वनवासी राम माझा...)
 
सृष्टीच्या सृष्टिकर्त्या !
कोणी पाहिले तुला ? ॥धृ.॥

काननात बसती साधू,
नातुडसी त्याला ॥१॥
 
ध्यान लावुनिया योगी,
बघती ध्यानि तुला ॥२॥
 
रंक- राव स्मरती तुजला,
भेटसी न त्याला ॥३॥
 
साक्ष अशी असती नेत्या,
नेत्रि बघायला ॥४॥
 
शांतविण्या तुकड्यादासा,
येशि का कृपाला ! ॥५