वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

कां रुसला देवदेवा !

(चाल : वनवासी राम माझा..) 
 
कां रुसला देवदेवा !
भेटी द्यावि या दीना ॥धृ.॥

दीनाचा दयाळू अससी,
आस ही मना ॥१
 
मोहिले कुणी का तुजला ?
म्हणुनि येईना ॥२॥
 
काय कुठे गेला अससी,
स्वर्गि पाहुणा ? ३॥
 
मनाचा कृपाळू अससी,
 नाडला कुणा ? ॥४
 
शांतविण्या तुकड्यादासा,
ये दयाघना ॥५