वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

कसा निभवशी काळ

(चाल : चंद्रकांत राजाची कन्या...)

कसा निभवशी काळ कळेना, मज सद्गुरु माते !
मृत्यु बरा परि चिंता नलगे, ने अपुल्या पंथे ॥धृ.॥
 
कामादिक हे शत्रु गांजिती, वरचेवर भारी ।
किति सोसू आपदा आई गे ! बनलो अविचारी ॥१॥
 
नष्ट प्राप्तिला कष्ट करीता, तनु गेली सारी ।
सुखदुःखाची वाट पाहता, भय झाले भारी ॥२॥
 
जिकडे तिकडे प्रपंच लहरी, उठती घनघोरी ।
आयुष्याची कमती झाली, ना पुरती दोरी ॥३॥ 
 
तुकड्यादासा आस लावुनी, का फसवी केली ?
ब्रीद तुझे गे ! थोर म्हणउनी, वरचेवर झेली ॥४॥