वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

वनवासी म्हणविणाऱ्या !

(चाल : वनवासी राम माझा...)
 
वनवासी म्हणविणाऱ्या !
कोणी धाडिले तुला ? धृ.॥
 
भक्त-काज पुरवायासी,
धावूनिया गेला ॥१॥
 
भिल्लिणिची बोरे खासी,
शांतविण्या तिजला ॥२॥
 
राजऋषी भेटी छाया,
असुर वधायाला 

शिला अहिल्येची बघुनी,
उठविण्या तियेला ॥४॥
 
शांतविण्या तुकड्यादासा,
वेळ काय केला ? ॥५