वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

किति उरली वेळ आता

(चाल : वनवासी राम माझा...)

किति उरली वेळ आता,
देवा ! यावया तुम्हा ? धृ.॥

धर्मभ्रष्ट नयनी दिसती वाढली जनी या कुमती ।
धर्म- व्रत न लागे हाती, पहावया तुम्हा ॥१
 
साधू, संत छळणी आले, असुरि राज्य सारे गिळिले 
 श्रेष्ठ अहंतेने चळले, पावले भ्रमा ॥२
 
 मातृभूमि रुसली सगळी, तृप्तिसि ना धान्या उफळी ।
गो- पशुसी देताति बळी, जाहली सिमा ॥३॥
 
शांतविण्या तुकड्यादासा, आठवावयासी श्वासा ।
उरलि एक तुमची आशा प्रभू ! नमोनमा ! ॥४॥