वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

का रुसला देवराया !

(चाल: शिणले हे नेत्र माझे..)

का रुसला देवराया ! अमुच्या या भारता ?
नच उरला धर्म काही, नच उरली स्वात्मता ॥धृ.॥

चहु वर्णा नाश झाला, शिरलीसे भ्रष्टता ।
बहु पंगू देश झाला, अजुनी का पाहता ? ॥१॥

विरवृत्ती नष्ट झाली, घरि आली लोलता ।
दास्याची बंध - बेडी, करि पडली पाहता ॥२

घाबरला जीव माझा, न टिके ही शांतता ।
धावत ये सत्वरी बा ! दे हृदया धीरता ३॥

नच दुसरी आस आता, बल देई ऐक्यता ।
ये तोडी श्रृंखला ही, तुकड्याची तू स्वता ॥४॥