वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अति व्याकुळ हे मन शांति नसे

(चाल : गुरु तुमहि तो हो गुरु...)
 
अति व्याकुळ हे मन शांति नसे,
 करू काय कसे ? न सुचे हरि रे ! ॥धृ.
 
जप-तप नाना करुनी श्रमलो,
 चंचल मन हे नावरि रे ! ॥१॥
 
तिर्थी धोंडापाणी पुजिले,
 पक्ष्यासम फेरे करि रे ! ॥२॥
 
दान - पुण्य योगहि ते केले,
 वाढे अभिमानचि उरि रे ! ॥३॥
 
तुकड्यादास म्हणे ज्ञानाविण,
 सुख नसे दुसरे तरि रे ! ॥४॥