वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अति लोभ फळे न कुणास कधी

(चाल : निघते पद एक घरी...)
 
अति लोभ फळे न कुणास कधी 
 विसरुच नका वचना असल्या ॥धृ.
 
प्रभुने दिभली दुनिया सगळी,
झणि कष्ट करा सुखी व्हा म्हणूनि 
गरिबा अति दुःखचि का मग हे ?
उपकार करा असल्या नसल्या ॥१॥
 
एकास गहु दुसर्‍यास तुरी,
तिसऱ्यास जवारीही न घरी ।
हा न्याय नसे प्रभुच्या घरचा,
प्रभु पाहतसे रुसल्या रूसल्या ॥२॥
 
सगळे सुखी व्हा सुख मार्गचि हा,
एकास मिळे हे दुःख महा ।
मग कोणी असो नृप-रंक कधी,
जाईल कळेना तो फसल्या ॥३॥
 
चिरकाल सुखे टिकतील सदा,
सगळ्या मिळुनी सुखी व्हा सगळे 
तुकड्या म्हणे याद न ही विसरा,
घ्या पाठ असा बसल्या बसल्या ॥४॥