वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अति घोर भवाची ज्वाला

(चाल : अशि घाल गळा मिठि बाळा...)
 
अति घोर भवाची ज्वाला,
ज्वाला गा ! धृ.
 
चैन पडेना क्षणभर देहा,
ग्रासु बघे ? विषयाला गा ! ॥१॥
 
सत्संगतिला वेळ न फावे,
कठिण गमे चित्ताला गा ! ॥२
 
मद - मत्सर हे धूर तियेचे,
उंच नेत मनुजाला गा ! ॥३
 
तुकड्यादास म्हणे मज निववी,
एक गुरुचा प्याला गा ! ॥४