आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
प्रकरण सातवे
पुसे एक श्रोता साचार । तया लागी ग्रंथ-विस्तार ।
कथन करावे सविस्तर । षड्चक्रांचे वर्णन ते ॥१॥
चक्री दळे ती कवण । किती दळे कोणता वर्ण ।
जप किती कवण स्थान । नेमस्त सांगेन मी ॥२॥
घेवोनि रिद्धिसिद्धीसही । देव गणेश कोठे राही ।
स्थान किती दळी पाही । जप किती चाले हो ॥३॥
ऐसी ती सहा स्थाने । ओळखोनि घ्यावी साधारणे ।
पुढे बोलेन अल्पवचने । श्रोती सावधान व्हावे ॥४॥
प्रथम चक्र मूलाधार । वर्ण तयाचा रक्ताकार ।
बसे गुदस्थानावर । तोचि देव गणेश ॥५॥
चतुर्दक कमळ, ईश्वर देव । जप सहाशे पहा हो !
तेथे कल्पनेची वाव । वाढू न शके सर्वथा ॥६॥
ब्रम्हा लिंगस्थानी वसे । पीतवर्ण तयाचा दिसे ।
स्वाधिष्ठान म्हणती खासे । देव अग्नि राही तो ॥७॥
शक्ति सावित्री तो जाण । करोनि षड्दळी शयन ।
जप सहाशे प्रमाण । चालतसे नेमे ॥८॥
दश दळांवरी येवोनि । वास करी कमलाराणी ।
वर्ण निळा, नाभिस्थानी । वास करी विष्णु हो ! ॥९॥
नाम चक्र मणिपूर । ऋषि वायु तो सुंदर ।
जप चाले सहा सहस्त्र । नेमे सदैव त्या ठायी ॥१०॥
अनुहत चक्राचे वर्णन । हृदयी असे परिपूर्ण ।
वास करी उमारमण । देवि पार्वती त्या ठायी ॥११॥
सहा सहस्त्र चाले जप । सूर्य ऋषि शोभे अमूप ।
द्वादशदली आपोआप । जप चाले नेमेसी ॥१२॥
शुभ्र वर्ण, जीव देव । चंद्र असे ऋषि-नांव ।
षोडश दळे पहा हो ! । तये स्थानी ॥१३॥

विशुद्ध चक्र कंठस्थान । शक्ति अविद्या तेथे जाण ।
जप सहस्त्र एक प्रमाण । अनुभव ऐसा असे ॥१४॥
अग्निचक्र भुवांतरी। वर्ण पीत, ज्योति बरी ।
माया शोभतसे सुंदरी । हंसऋषी बसतसे ॥१५॥
देवता ती परमहंस । जप एक सहस्त्र खास ।
आज्ञाचक्री या द्विदल आभास । पाही प्राणिया ! की ॥१६॥
पुढे सहस्त्रदळ सुंदर । नाम तयाचे ब्रम्हरंध्र ।
तेथे गुरुदेव करूणाकर । वसतसे सर्वदा ॥१७॥
परम देवता ऋषि । ज्ञानशक्ति बसे खासी ।
ऊर्ध्वद्वारे संचार त्यासी । होऊ लागे सत्वरी ॥१८॥
सहस्त्रदल मुख्य स्थान । नाना ध्वनी अनेक वर्ण ।
जप सहस्त्र प्रमाण । सोहंबीज तेथचि ॥१९॥
सोहंबीज अजपा । एकाग्रतेचा मार्ग सोपा ।
जेणे केले शुद्ध मापा । तोचि दृष्टी पाही की ॥२०॥
नसता देही लक्ष्य-भान । जाणेना तेचि अज्ञान ।
म्हणे दिसावे चक्र वर्ण । केवी घडे तयासी ? ॥२१॥
प्राणी असे अहंकारी । परोक्षेसी बोले परी ।
तेथे षड्चक्रांची थोरी । न वर्णवे कदापि ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । सप्तम प्रकरण संपूर्णम् ॥२३॥