वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

कुणि सांगा हो, कुणि सांगा

(चाल : जगदीशा जगत्पाला...)

कुणि सांगा हो, कुणि सांगा हो,
कुणि सांगा राम कुठे माझा ॥धृ.॥

कोठे जाउनि पाहिन त्याला ?
जवळी तो की विवरी गेला ?
दीन अभाग्या का अंतरला ?
पुरविल जिविच्या या काजा ॥१॥

वनवन फिरता टपले डोळे,
दुःखित शरिरे झाले सोहळे ।
नेत्र पिसे खळवळले भोळे,
पाहण्या सुंदरशा साजा ॥२॥

जन्मापासुनि दु:खित झालो,
गृह-धनदारा यातचि भुललो ।
'मी मोठा' हे म्हणता झुललो,
सांडियली शरिरे लाजा ॥३॥

संतकृपे आठव ती झाली,
नेत्रा तळमळ धुंदी भरली ।
आस जगाची सगळी हरली,
तुकड्या पद-जल ते पाजा ॥४॥