वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अखिल विश्वमंदिर माझ्या

(चाल : आकळे न अघटित...)

अखिल विश्वमंदिर माझ्या आत्ममूर्तिचे ।
खेळ हे निसर्गे त्याच्यां कार्य - पूर्तिचे धृ.॥

वाहती नदी-सागर हे, स्नान घालण्या तयासी ।
पृथ्वि हेच सिंहासन त्या चक्रवर्तिचे ॥ माझ्या... ॥१॥

वसंतबाग फुलला फलला, हार अर्पिण्या तयासी ।
सुगंधित चंदनकाष्ठे, गंध हे पुजेचे  माझ्या... ॥२॥

पृथ्वि अन्न शिजले जे जे, भोग द्यावयास यासी ।
जळति द्रव्य-धातू सगळे,हवन होतसे  माझ्या... ॥३॥

सूर्यचंद्र नंदादिप हे, जळति ज्योत द्यावयासी ।
पवन मंद वाहे सुखवी, हृदय हे तिचे ॥ माझ्या... ॥४॥

निर्विकल्प चिद् आत्मा हा, भोगुनी अभोक्ता राही ।
दास सांगतो तुकड्या हे भाव स्फूर्तिचे ॥ माझ्या... ॥५॥