वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अखिल विश्‍व-चालक माझा

अखिल विश्‍व-चालक माझा, कृष्ण गोजिरा ।
करुनिया अकर्ता राही, साक्षि हा पुरा ॥धृ.॥

सृष्टि-खेळ खेळे सदनी ।
बसुनि आपुल्या निजशयनी ॥
आपणची बघतो नयनी, दृश्य साजिरा ॥१॥

क्रिडवि गोप-गोपी मेळा ।
लावुनी परस्पर डोळा ॥
राहि तो निराळा भोळा, लिंपि ना जरा ॥२॥

ज्ञानियांस ज्ञानी दिसतो ।
प्रेमियांस प्रेमी गमतो ॥
दुर्जनास काळासम तो, भासतो खरा ॥३॥

सर्व कळा ज्याच्या अंगी ।
भाविकांसि भिक्षा मागी ॥
विषय सेवुनि वितरागी, झळकतो हिरा ॥४॥

ध्याति भक्त जे जे त्यासी ।
देइ शांती-दांती श्वासी ॥
आस पुरविली तुकड्याची, धावुनी त्वरा ॥५॥