आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)
अध्याय दुसरा
(श्रीसद्गुरू - प्रार्थना)
धावसी दासाचिये कामा । नाम घेता सद्गुरो ! ॥१॥
म्हणोनि जोडोनि द्वय कर । शरण आलो स्वामिया ! ॥२॥
म्हणोनि काळाचे आटोपा । बुडालो सर्वस्वी गुरुमाते ! ॥३॥
हां तंव अज्ञ पुत्र बापुडा । अंध:कारी बुडाला गाढा ।
काढावयासी हां पवाडा । चरणी वदिंतो सद्-भावे ॥४॥
म्हणोनि हां बहू ओखटे । भोगतसे स्वामिया ! ॥५॥
ऐसाचि हां अज्ञानी । नाना दु:खी बुडाला ॥६॥
मायापाशी गुंडाळला । आळशी झाला उपासनेला ।
न दिसे मार्ग दुजा मनाला । उद्धरावया जीव हां ॥७॥
कैसे कृत्य करी घ्यावे ? । तुटावया भवपाश ॥८॥
कैसा नेम मी धरावा ? । जेणे भवाब्धी हा तरावा ।
शुद्ध प्रेमा हृदयी भरावा । निजानंद पाहावया ॥९॥
न मिळे मार्ग सविस्तर । ऐक्यरुप व्हांवया ॥१०॥
चाखूं जाता हृदय फाटे । न फिटे भ्रांति-पडळ ॥११॥
पुन्हा पुन्हा वृत्ती धावे । असत्याकडे ॥१२॥
स्थिर क्षण न एकटे । निश्चली तें राहात ॥१३॥
पंचविषयी रतले बरवें । जडले सर्वस्वी स्वभावे ।
कैसे तुटेल न आठवे । मज लागूनि सद्गुरो ! ॥१४॥
एकाएकी चोर भरले । देहामाजी न सांगवे ॥१५॥
व्यर्थ जाईल देहस्थिती । भोगावया जीव हां ॥१६॥
किती सांगावे सांगणे ? । पाठी घेतली अवगुणे ।
संसारहेतू तुटे जेणें । ऐसे करा स्वामियां ! ॥१७॥
दासे दासत्वपण राखावे । ऐंसे करी माते वो ! ॥१८॥
जयजयाजी सद्गुरुनाथा ! । पुरवी काजा येवोनिया ॥१९॥
सोडोनिया ज्ञातेपण । सद्-भावे आलो शरण ।
दासा दावोनि भवतरण । पार लावी नौका ही ॥२०॥
दासा दावोनि भवतरण । पार लावी नौका ही ॥२०॥
भरवी आनंद-संवाद । हृदयी माझ्या ॥२१॥
भरवी मम हृदय-संपुष्टी । येवोनिया सद्गुरो ! ॥२२॥
पुढिलिये प्रकरणी ठेव । दावियेली सद्-भावे ॥२३॥
तुकड्यादास विरचित । द्वितीय अध्याय संपूर्ण ॥२४॥