वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण बारावे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण बारावे

अध्यात्मसाधन


आता सांगेन मुख्य साधन । घेवोनिया शास्त्रार्थ प्रमाण ।
वासनेचे करी हनन । विशेषत: ॥१॥

जयाची खुंटली वासना । संकल्प मुरले जाणा ।
तया प्राणियांच्या यातना । चुकल्या सर्वथा 
॥२

नित्यानित्य-विचारावीण । वासना न खुंटेचि जाण ।
शोधू जाता नित्य निधान । अनित्य उडेल निश्चये ॥३॥

प्रथम आत्मा-अनात्मा कोण । हेचि काढावे निवडोन ।
तयासीच आत्मविचार जाण । म्हणती संतयोगी ते 
॥४

जंव तू आत्मविचार करिशी । तवं ते अनात्म सर्व सांडिशी ।
तीन देहांविरहित होशी । सत्य जाण बापा रे ! ॥५॥

देह द्वयाचे चळण । वर्तती इंद्रिये आणि प्राण।
सप्तधातूंचे प्रमाण 
 त्याहि वेगळा जाण तू ॥६॥

अष्टधा प्रकृति म्हणती जे । तिये तुजपाशी न लागिजे ।
सर्वा विरहित राहिजे । साक्षिभूत अखंडित ॥७॥

ऐसा हा करिता आत्मविवेक । अनात्म-वासना मुरेल देख ।
वृक्ष सर्वहि काल्पनिक । अंत होई तयाचा ॥८॥

जगी सर्व विद्याकला असती । अध्यात्म त्याहुनि श्रेष्ठ निगुती ।
योगीहि तयासी मान देती । प्रेमादरे करुनिया 
॥९

असोनिया श्रेष्ठ अध्यात्म । त्यांतहि गहन आत्म-वर्म।
जयासी ज्ञान ऐसे नाम । देती ज्ञानी यथार्थ 
॥१०

ज्ञान झालिया गोमटे । मग ज्ञेय ज्ञाताचि उमटे ।
कोणी ब्रह्मचि चोखटे । म्हणती तथा 
॥११

शब्दाचे पोटी लक्षार्थ । तो दाविती ज्ञानीसंत समर्थ ।
तया वाचूनिया भ्रांत । न फिटे मनाची 
॥१२

सर्व इंद्रिया मना वळण । देई कोण तोचि जाण ।
अष्टधा प्रकृतीचे संचालन । करी साक्षिरूप तो 
॥१३

सुखदुःख खेळ जाणे तोचि । मुळी वार्ता नसे द्वैताची ।
करी सर्व लीला अद्वैतचि । साक्षि आत्मा जाणावा 
॥१४

आत्मसाक्षात्कार झाला । न भासे गुणधर्म तयाला ।
स्थूल सूक्ष्म कारणाला । विसरोनि जाय ॥१५॥

ऐसी जयाची होय स्थिति । तया दृश्य-भेद न भासती।
वासना जिथल्या तिथेचि मुरती । तया नराच्या 
॥१६

जयाची होय अद्वैत वृत्ति । तया ब्रह्मात्मा दिसे सर्वांभूती ।
तेथे अज्ञानाची न चले गति । वासना उरती मग कैच्या 
॥१७

स्वप्नातूनि ठायी आला । स्वप्नसुख दुःखे कैसी त्याला ?
तैसेचि मिळता ब्रह्मस्थितीला । अज्ञानजन्य जग गेले ॥१८॥

पाप-पुण्य यांच्या नेम 
 तेथे न राहे सुखसंभ्रम 
हे तो देहभिमाचे काम  भौतिक वासना उपजविण ॥१९॥

ऐसे करावे साजन 
। अनात्म जाणूनी आत्मदर्षण 
भ्रांती फिटलिया होईल जाण  वासनाक्षय पूर्णपणे ॥२०॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे 
 वेदान्तसार संमते 
तुकडयादास विचचिते  द्वादश प्रकरण संपूर्णम् ॥२१॥