आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
(ओवीबद्ध ग्रंथ)
प्रकरण तेरावे
कितीही सांगेन गा परोक्ष । तरी केलीयावीण नव्हे अपरोक्ष ।
तया अपरोक्षाचा पक्ष । घेवोनि वदेन गुरुकृपे ॥१॥
लावावया आत्मशोध । केवी भरला सर्वी शुद्ध ।
तयाचा व्हावया बोध । आत्मनिरुपण सांगेन हो ॥२॥
आत्मा कोण हे ओळखण । जो देतसे स्वयंस्फुरण ।

तयास आत्मा ऐसे अभिधान । देती योगी ॥३॥
देहाभिमाने साचला मळ । काढून टाकी जो सकळ ।
तयास आत्मा आहे निर्मळ । हे कळोनि येई ॥४॥
आत्मा स्वयंज्योती असोनि एक । भरला कैसा हो सकळीक ।
तयाची व्हावया ओळख । सांगेन थोडे पुढे ते ॥५॥
संपूर्ण काचियाचा महाल । तेथे जाहले एक नवल ।
आत श्वान ते शबल । शिरले असे ॥६॥
तया श्वानाची दृष्टि । जिकडे जाय उठाउठी ।
तया सर्वत्र पाठी पोटी । स्वरूपचि दिसे ॥७॥
परि त्या ऐसे न गमेचि । की हे मम स्वरूप निश्चयेसी ।
तो ओरडू लागला मानसी । दुजे म्हणोनि ते वेळा ॥८॥
तयाचे प्रेमे कवटाळणे । आणि क्रोधे चवताळणे ।
देहा कष्टवी द्वैतपणे । दु:खा कारण स्वरूपभ्रांति ॥९॥
तैसेचि बुद्धीचिया गुणे । भ्रमी पडले शहाणे ।
व्यापक आत्मा कोण त्या जाणे । बुद्धिहीन? ॥१०॥
जयाची बुद्धि सरसावली । तयासी एकात्मता दिसली ।
वासना वैरवृति निमाली । एक सरे तयाची ॥११॥
सर्वथा द्वैतबुद्धीचिया योगे । वासना अहंकारादि वाढ घे ।
म्हणोनि आत्मतत्त्वचि वावुगे । दिसते तया ॥१२॥
जेवि आकाशी वायु उठला । सर्व धुळीने धुम्रावला ।
तैसाचि आत्मा बुद्धीने झाकोळला । ऐसे जाण बापारे ! ॥१३॥

सत्य असोनि ठायीच शुद्ध । देहाभिमाने वाटे बद्ध ।
अष्टधा प्रकृतीचे युद्ध । दिसो लागे त्याच्याचि सत्ते ॥१४॥
जयासी असे जनन-मरण । तो समजावा अनात्मा जाण ।
तेथे आत्म्याचे प्रमाण । न लागे की ॥१५॥
अंध दृष्टीचे जे जन । तयांची दृष्टी ऐसी आहे म्हण ।
प्राण गेलिया म्हणती जाण । देहासहित मेला आत्मा ॥१६॥
सत्य करोनि शोध पाहता । आत्मा जर नसे तत्त्वता ।
चालवी देहेंद्रियसंघाता । म्हणोनि दिसे जड विकारी ॥१७॥
सूर्या झाकोळती ढग । वाटे सूर्यचि झाला अपंग ।
परि तो अलिप्तचि, दावी रंग । ढगाचेहि स्वतेजे ॥१८॥
जेवि सत्याचिया योगे । असत्य दिसते त्यातचि जागे ।
की बुद्धीने निर्मिले द्वैतधागे । त्या सर्वा आत्मा प्रकाशक ॥१९॥
परि या जडाचिया आधारे । चेतनहि जणू गुदमरे ।
जाणूनि गुणावगुण लावूनि घे तुरे । जडचि दिसे ॥२०॥
पाहता पुढे सूक्ष्म दृष्टी । आत्मज्ञाने लाभे तुष्टी ।
जड निवडोनि वारिता सृष्टि । चैतन्य दिसे स्वयंप्रभ ॥२१॥
तयास्तव सांगितला मी नेम । मुख्य सत्संगतीचे काम
उकलोनिया आत्म-अनात्म । स्वानुभव घ्यावा चातुर्ये ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । त्रयोदश प्रकरण संपूर्णम् ॥२३॥