वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण चौदावे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण चौदावे

अद्वैतानुभव

 
नित्य सावध राही नरा ! नित्यानित्य विवेक पाही बरा ।
सत्य असत्याचिये विचारा । लागे वेगी ॥१॥

जरी ख्यातिच व्हावी जगी । तरी मायिक प्रेम धरी वेगी ।
अनुभवणे असे स्वरूपालागी । तरी सत्संग धरावा 
॥२

जाऊनि गुरूसी शरण । पुसावे स्वामी मी कोण ? ।
आलो कासया कारण ? जगामाजी कोण माझे ? 
॥३

जरी धरिशी फार हट्ट । की सांगावी इतुकी गोष्ट ।
तेणे कळेल स्पष्ट स्पष्ट । स्वरूप तुझे 
॥४

भक्त कोण, देव कोण । हेचि पाहावे आधी जाण ।
मग शास्त्रांची गुंतवण । न लागेचि ॥५॥

विवेके शोधावे अंतरी । त्या महावाक्याचा अर्थ धरी ।
स्वतः बह्म कैसिया परी । आहे मी हो ! ॥६॥

स्वरूप शाश्वत पाहावया । अशाश्वत सोड माझे सखया !।
लक्ष लावी सत्य ठाया । शुद्ध जीवन करोनि 
॥७

पाहावया भगवंताकारण 
 क्षणिक नको वैराग्य 
ज्ञान ! अष्टधा प्रकृतीचे महिमान  दुर सारी ॥८॥

दृष्टी दिसे जे जे काही । विवेके सांडी सर्व पाही ।
मायिकांचे सूक्ष्म लक्षण तेहि । दूर करी 
॥९

जेथे नसे पंचभूत । कल्पनातीत तत्त्व अद्भुत ।
निर्विकार स्वसंवित । तेचि जाण स्वठायी 
॥१०

सत्य काय आहे बापा ! त्वरित पाही, घेई मापा ।
असत्याच्या निवारी पापा । स्वस्वरूपा जाण सख्या ! ॥११॥

बोधरहित बुद्धीने घुसती । अंधारी अद्वैत न होती ।
ते जरी स्वरूप शोधती । तरी होती तेचि ते ॥१२


जरी गड्या ! घेशील शोधा । तरी न लगे द्वैतबाधा ।
फोडीत सर्व अंध बंधा । प्रकाश पडे सर्वत्र ॥१३


जे जे असत्य अनात्म बंध । तेहि चैतन्यचि नटले विशद्ध ।
अन्य भासे हा कल्पना-बाध । स्वयंसिद्ध नातरी तू ॥१४


येथे दुजे कोठूनि आले ? जे बंधासि कारण झाले ।
ही तो स्वरूपसागरावरी फुले । फुलली जणु गारांची ॥१५॥

हे अनुभवी तोचि मुक्त । देही असोनि देहातीत ।
जन्मोनीहि अजन्मा निश्चित । आत्मदृष्टी ॥१६॥

लक्ष चौऱ्यांशी जाण योनि । मुक्त होशील त्यांतूनि ।
बोलणे सत्य घे जाणूनि । गुरुकृपे ॥१७


इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार 
संमते ।
तुकड्यादास विरचिते । चतुर्दश प्रकरण संपूर्णम् ॥१८॥