आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)
अध्याय चौथा
(शुद्धाशुद्ध जीव स्वरूप - (कुटस्थ))
वैराग्य झालिया मनन । काय कैसे करावे ? ॥१॥
निरिच्छ निर्मल हंसपक्षी । पदवी जया न लगे ॥२॥
वैराग्य तें कासयासी । करावे होऊनि सायासी ? ।
हेचि बोलणे अनायासी । बोलू आता निश्चये ॥३॥
हेचि बोलणे अनायासी । बोलू आता निश्चये ॥३॥
रज-तमाने वेष्टिला । मागे पुढे ॥४॥
हें तों स्वामी ! मला । कृपा करुन सांगावे ॥५॥
तें आरशात प्रतिबिंब जाण । तेजरुप दावितसे ॥६॥
चैतन्यसूर्य निर्विकार । उजेड दावी आपुला ॥७॥
अविद्येत प्रतिबिंबी अमूप । म्हणोनिया ॥८॥
चिदात्मा अविद्येत गुंगला । म्हणोनि विकारा पावला ।
तयासी जीव ऐसे बोलिला । श्रृतिवाद ॥९॥
म्हणोन जीव द्वैत भान । अंगी बाणवून घेतसे ॥१०॥
म्हणोनि अविद्यागुणे जीव । ऐसे नांव ठेविले ॥११॥
स्वामी ! जीवाचे स्थानमान । कोणे ठायी वदावे ? ॥१२॥
ऐक जीवाचे शरीर । तया तीन अवस्थांतर ।
स्थूल-सुक्ष्म-कारण घर । तया जीवासी जाणिजे ॥१३॥
जीव अभिमानियाचे पीठ । निश्चयेंसि जाणावे ॥१४॥
विश्व, तैजस, प्राज्ञ । नामाभिधान तयासी ॥१५॥
तयास हिरण्यागर्भादि भान । पाळावे लागे सर्वदा ॥१६॥
कूटस्थ, ईश्वर, मुक्त चैतन्य । दृश्यातीत ॥१७॥
तयास बुध्दी मलीनपणी । संगे फिरवी सर्वदा ॥१८॥
परी सुख-दुःखाचे अवघटन । भोगावे लागे संमेलनी ॥१९॥
तयाचे मुकावया भोगतेपण। चुकवावया दु:खादि दारुण ।
म्हणोनि वैराग्य हे साधन । धरणे लागे तयासी ॥२०॥
ना तरी विनाश अभिमाने । भासरुप जीवाचा ॥२१॥
वैराग्यादि साधने अमूप । करणे लागे सायासे ॥२२॥
म्हणजे जन्म-मरणादि गलबला । भोगावा न लागे ॥२३॥
रज-तमादि लोपून । शुध्दसत्व मिळावया ॥२४॥
साक्षीरूप काय ते जाणोन । तयारूपी मिळावे ॥२५॥
कळवू विशद करूनी । जाणावया साधकां ॥२६॥
आत्मप्रभाव ग्रंथ । चतुर्थोऽध्याय गोड हा ॥२७॥