आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)
अध्याय पाचवा
(आत्मज्ञान निरूपण)
ज्ञान-अज्ञान सारासार । अनुवाद कथियेला ॥१॥
त्याचे तोडावया भान । घ्यावे ज्ञान साधके ॥२॥
चातुर्ये, कौशल्ये आगळा । येथे न चले कदापि ॥३॥
ज्ञान नव्हे ग्रंथ पठन । ज्ञान नव्हे शहाणपण ।
ज्ञान नव्हे लिप्तपण । शोधकांचे अपूर्व ॥४॥
ज्ञान नव्हे ग्रंथ पठन । ज्ञान नव्हे शहाणपण ।
ज्ञान नव्हे लिप्तपण । शोधकांचे अपूर्व ॥४॥
ज्ञान नव्हे साधुत्व थाट । जमवी अंगी आपुलिया ॥५॥
ज्ञान म्हणजे मूळ स्मरणे । आपुलिया स्वरूपाचे ॥६॥
हेचि शोधावे आपुलेपण । यासी ज्ञान म्हणावे ॥७॥
साधक, साधन किंवा कर्ता ? । ओळखावे ज्ञानिये ॥८॥
मी तों अशुध्द किंवा शुध्द ? । हांचि कळावया भेद ।
करावा पूर्ण सुखसंवाद । ज्ञानियांसी ॥९॥
जाळोनिया मायिक धूप । वृत्यांचिया साक्षित्वे ॥१०॥
जाणावे आपुले आपण । या नांव ज्ञान ॥११॥
तंव जावे अदृश्य गगनात । या नांव ज्ञान ॥१२॥
सारतत्व तें चिंतावे । या नांव ज्ञान ॥१३॥
सोडोनियां आप-पर । पाहावा सत्याचा विचार ।
निर्भय होऊनि घ्यावे सार । यासी ज्ञान म्हणावे ॥१४॥
ज्ञान अमंगळासी निर्मल । करी अंतरंगे पांहता ॥१५॥
मग फिरताति त्या माघारा । परा-पश्यंति-मध्यमा ॥१६॥
स्वरुपी जाऊनि दाटली । जयें ज्ञाने ॥१७॥
ठावे नाही मुक्त जिणे । सत्यवंता वाचूनिया ॥१८॥
अभाविकता लया गेली । जयां ज्ञाने ॥१९॥
सांडोनिया भिन्न भाने । एक सर्वी सर्वचि ॥२०॥
निव्वळ काही शब्द ज्ञाने । ज्ञान नोहे सर्वथा ॥२१॥
तरी हें जाईल सर्व वृथा । वाचिक ज्ञान ॥२२॥
तरी ऐकले तें श्रवण-ज्ञान । कामी पडेना ॥२३॥
न झालिया श्रवण वाया जिणे । श्रवणा मनने उभारणे ।
न झालिया तै निजध्यास खुणे । साक्षात्कार कैसा होय ? ॥२४॥
अंगी होऊनि उदास । ज्ञानसार शोधावे ॥२५॥
परोक्ष तो शिकोन । अपरोक्ष अंतरंगी जाणावे ॥२६॥
एकाएकी आडवा आला । कर्मभोग स्वामिया! ॥२७॥
कर्मबंध न तुटे जाणा । गहन गहन कर्मगती ॥२८॥
एके जन्मीच हें अनुभवून । कैंसे काढुं स्वामिया ? ॥२९॥
प्रारब्ध म्हणोनि घेतो कपाळ । अज्ञानरूपे गड्या रे ! ॥३०॥
यां शंकेचे निरसन । प्रेमें करिती सद्गुरु ॥३१॥
आत्मप्रभाव ग्रंथ । पंचमाध्याय कथियेला ॥३२॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ! ॥