वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अजुनि तुला का न ये

(चाल : अपने आतम के चिंतन में...)

अजुनि तुला का न ये दया मम ? 
फिरता फिरता शिणलो रे ! 
जाहिर नाम 'पतितपावन' तव,
अंत कितीतरि बघतो रे! ॥धृ.॥

दे आधार त्वरित चरणाचा,
तुजला आण गळ्याची रे !।
जग-कल्याणा अवतार तुझा,
कामक्रोधि मी पिडलो रे ! ॥१॥

सकल जगाचा उद्धारक तू,
सद्‌गुरु स्वामी आडकुजी ! ।
अधम पातकी तरति दर्शने,
हा तव देवा ! महिमा रे ! ॥२
 
तुकड्या तो वर मागे तुजला,
जन्ममरण-भय तोडी रे !।
नित्य असू दे सद्‌गुरुराया !
तव चरणाची गोडी रे ! ॥३