आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
प्रकरण पाचवे
प्रपंचाअंगी तैसा भोग । घडे केवि ? ॥१॥
जो नर सोडी प्रपंचभान । तयाने करावा हठयोग जाण ।
ब्रह्मचर्य राहोन । मानापमान सांडावा ॥२॥
जयाने हठयोग घ्यावा । तयाने अहंभाव सोडावा ।
स्वदेहाची पर्वा । न करावी किमपिही ॥३॥
विहंगम मार्ग हठयोग । तेथे भोग तितुका रोग ।

इतर सोडोनिया उद्योग । होई सादर नेमेसी ॥४॥
सर्वहि मार्ग एक होत । पाहता दिसती जरी अनेक पंथ ।
परंतु सर्वातहि एकांत । साधला पाहिजे ॥५॥
करोनिया पाया मजबूत । मग घ्यावा कुणीहि पंथ ।
पाहावा तयाचाहि अंत । सुलभ मार्ग अंगीकारूनि ॥६॥
जावोनिया एका पंथे । मग पडताळी विभिन्न मते ।
इकडे तिकडे पाहोनि जाते । राहते वृत्ति अढळचि ।।७।।
बोलावयासी वाटे गोड । पंथ उचलिता न पुरती कोड ।
तो बोलायाची चाड । व्यर्थचि करी ॥८॥
मागे सांगितले साधन । पंचमुद्रायोग पुर्ण ।
आता हठयोग जाण । वर्णीतसे अल्पमती ॥९॥
प्रथम पाहोनि एकांत स्थान । जेथे कोणी नसे वास्तव्य करोन ।
आधी करोनि एकाग्र मन । तेथे जावोन राही तू ॥१०॥
ठेवोनिया दक्षिण चरणासी । जाई मणिपूर स्वाधिष्ठानासी ।
ओढोनिया मूलाधारेसी । स्वस्थ उगा राही की ॥११॥
मग सोडी वर प्राण । दोन्ही मिळवी प्राण अपान ।
अनाहती विश्वघ्न । दैवत वसे असे जाण पां ॥१२॥
गुरु असावा सामोरी । मेरूची गाठ उठते वरी ।
श्वास रोधी रे निर्धारी । हठयोग असा स्वानुभूत ॥१३॥
क्षणोक्षणी चक्रे दिसती । नित्यनियमे जप चालती ।
षड्चक्रांचे भंवती । अनुभव ऐसा ॥१४॥
त्रिकुटी मिळती मुद्रा तीन । भ्रमरगुंफेसी जाती दोन ।
पश्चिमेसी तिसरा जाण । एक मार्ग जात असे ॥१५॥
पुढे दिसे वैकुंठनगर । अनंत रंगाचे माहेर ।
उभी असे द्वारी नार । मायाराणी ॥१६॥
पुढे तया नगरा आंत । कोटि सूर्यप्रकाश दिसत ।
गुरूदर्शनाचा एकांत । लाभे तया स्थळी ॥१७॥
पाहणे अधिक दिसणे । होती एक अद्वैतपणे ।
समाधी राही तयागुणे । अखंडित ॥१८॥
मार्गक्रमण कीजे हळूहळू । जैसे तीन महिन्याचे बाळू ।
जेवि पिपिलिकेचा खेळू । चालतसे ॥१९॥
जरी हठयोग केला । हट्टानेचि पुढे गेला ।
तरी तो हट्ट पाहिजे मुरविला । प्रेमामध्ये ॥२०॥
ब्रह्मानंदी उठती लहरी । न चाले द्वैताची फेरी ।
राहोनि निवांत जैसे तैशापरी । आनंद करी परिपूर्ण ॥२१॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । पंचम प्रकरण संपूर्णम् ॥२२॥