वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

निववी हे नेत्र माझे

(चाल : शिणले हे नेत्र माझे...)

निववी हे नेत्र माझे, दे भेटी एकदा ।
व्याकुळ हा जीव झाला, भेटाया तव पदा धृ.

शास्त्रे ही गाति गाणीं, प्रभु धावे धावणी ।
दुर्भाग्य काय माझे ? भेटेना येउनी 

जरि पापी, दुष्ट आम्ही, निच याती जन्मलो ।
तरि नामे ईश्वराच्या, पद-कमली लाधलो 

नुरलीसे आस काही, धन दारा-हाव हे ।
प्रभु-सेवा प्रभु सेवा साधवावी, दृढ झाले भाव हे ॥३॥

बघ देवा ! एकदाची, दुर्भाग्या येउनी ।
तुकड्यासी ठाव देई, ही मागो मागणी ॥४॥