आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)
अध्याय सातवा
(इंद्रिये, प्राणादिंचा साक्षी)
पंचभूतमय देही जाण । असती दश इंद्रिये पूर्ण ।
येचि विषयी कथन । करुनी दावू श्रोतया ॥१॥
तयांसीच ज्ञानेंद्रिये सर्वत्र । म्हणती ज्ञाते जाणपा ॥२॥
तयास कर्ण ऐसे जनी । म्हणती ज्ञाते जाणपा ॥३॥
शरीरा वेष्ठुनी राहणे । त्वचा तेचि जाणपा ॥४॥
तयासीच चक्षू प्रमाण । म्हणती जाण योगी ते ॥५॥
रुची तये जिव्हे नि:शंक । कळो येई उत्थाने ॥६॥
सुगंध-दुर्गंधाचे जाणपण । ते ते नाकी होतसे ॥७॥
म्हणोनि ते तू नव्हे । निश्चयेसी जाणपा ॥८॥
कोण कोणे स्थानी सक्रिय । राहती ते जाणपा ॥९॥
ऐसे कर्मेद्रियपंचक । जाहले ते जाणपा ॥१०॥
जये स्थानी जिव्हिणी । वास करी तये स्थानी ॥११॥
तेचि हस्तेंद्रिय पाहणे । ज्ञातेजनी ॥१२॥
तया पादेंद्रिय म्हणोनि । म्हणती राया ! ॥१३॥
विष्टाविसर्जन कार्याला । साधन हेचि जाहले ॥१४॥
हे तो शिश्नइंद्रिय प्राप्त । ऐसे योगी बोलती ॥१५॥
तू सर्वाचा जाणता म्हणोन । इंद्रिये न होसी सर्वथा ॥१६॥
तयांचीही साक्षरता । दावितो तुज ॥१७॥
ऐसे जाण पंचप्राण । देही असती सर्वदा ॥१८॥
इयांच्या रजांशे की । जाहला तो प्राणसंच ॥१९॥
तयांचे पंचप्रकार जाण । जाहले या देहस्थिती ॥२०॥
समरसी शरीरी व्यान । ऐसे स्थान तयाचे ॥२१॥
ऐसे पंचप्राण सर्वही । तयांसी तू जाणता ॥२२॥
ययांचेही जाण ज्ञान । दावू उकलोन सर्वथा ॥२३॥
मनबुद्धी हा समुदाय । सूक्ष्म देह शक्तिरूप ॥२४॥
सुखदुःखादि भाग साचार । याच देही होतसे ॥२५॥
सर्व पाहसी साक्षी होऊन । देह इंद्रिय प्रारब्धासी ॥२६॥
म्हणोनि व्यष्टी नाम जाण । प्राप्त केले सर्वथा ॥२७॥
म्हणे मायी भूललो याला । मार्ग दावी माते वो ! ॥२८॥
लिंग-अभिमान जाळोन । साक्षी होऊन राही कैसा ? ॥२९॥
ऐक सांगेन आत्मगुज । प्राप्त कैसे करावे ? ॥३०॥
पुढिलिये निरूपणी पावसी । वाद मिटेल सर्व हो ॥३१॥
तुकड्यादास-विरचित । सप्तमाध्याय गोड हो ॥३२॥